Aniruddha Bapu Chandika Prasad Stotra
Chandika Prasad Stotra ( चंडिका प्रसाद स्तोत्र )
Aniruddha Bapu in his 2nd May English Discourse told everyone to chant atleast once Chandika Prasad stotra daily.So I tried to narrate the stotra and made a video for everyone.
Hari Om | Shree Ram | Ambadnya | Nathsamvidh
Click Link to see video:-

चंडिकाप्रसाद स्तोत्र
ही प्रेमळ आदिमाता फक्त माझीच माय आहे॥१॥
ही आदिमाताच माझ्या सप्तचक्रांची स्वामिनी आणि दोन सुप्तचक्रांची प्रेरणास्रोत आहे॥२॥
ही माझी आदिमाता एवढी विलक्षण सूंदर आहे, आणि म्हणूनच माझे जीवनही खुप सूंदर आहे॥३॥
ही माझी आदिमाता कधीच चुकत नाही, आणि म्हणूनच माझे जीवनही कधीच व्यर्थ जाणार नाही॥४॥
ही माझी आदिमाता कधीच विकृत होत नाही, आणि म्हणूनच माझे जीवनही कधीच विकृत होणार नाही॥५॥
ही माझी आदिमाता सदैव उत्साहाने भरलेली असते, आणि म्हणून माझे जीवनही उत्साहपूर्णच आहे॥६॥
ह्या माझ्या आदिमातेची प्रत्येक रचना निर्दोष आहे, आणि तिनेच माझीहि रचना केलेली आहे॥७॥
ह्या माझ्या आदिमातेनेच सूर्य, चंद्र आणि पृथ्वीला उचित वजन दिले आहे, आणि म्हणूनच ती माझ्या शरीराचे, मनाचे, बुद्धीचे वजन अर्थात् ओझे उचितच ठेवते॥८॥
ही माझी आदिमाता एवढी लवचिक आहे, आणि म्हणूनच मी कधीही मोडणार नाही॥९॥
ही माझी आदिमाता अंतःकरणाने एवढी कोमल आहे, आणि म्हणूनच मी कधीच दगड बनणार नाही॥१०॥
ह्या माझ्या आदिमातेला कुठलेही शस्त्र इजा करू शकत नाही, आणि म्हणूनच माझी वेदना कधी टिकु शकत नाही॥११॥
ही माझी आदिमाता कधीच कोणाचे वाइट करू इच्छित नाही, आणि म्हणूनच कुणीही माझे वाइट करू शकणार नाही॥१२॥
ही माझी आदिमाता कधीच पराभूत होत नाही, आणि म्हणूनच माझे अपयश ही मला अधिक संपन्न करेल॥१३॥
ही माझी आदिमाता ह्या विश्वातील प्रत्येक चूक दुरुस्त करीत असते, आणि म्हणूनच माझ्या त्रिविध देहातील विकृति तीच दुरुस्त करते, आणि मी अविकृत राहतो॥१४॥

ह्या माझ्या लाडक्या आदिमातेच्या प्रत्येक उच्छ्वासातून असंख्य अद्भुत चमत्कार बाहेर पडत असतात
आणि म्हणूनच तिचे नाम घेऊन जो श्वास मी आत घेतो, त्या श्वासाबरोबर माझ्या त्रिविध देहात अनेक चांगले चमत्कार घडत राहतात॥१५॥
हरी ॐ | श्री राम | अम्बद्न्या
0 Comments